नवी दिल्ली – उच्च वेतनासाठी देशभरातील बॅंकांनी बुधवार 30 आणि 31 मे रोजी संप पुकारला आहे. बॅंक कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय संपामुळे पगारी कर्मचाऱ्यांची गैरसोय होण्याची चिन्हे आहेत. तसेच संपामुळे एटीएममध्येही खडखडाट असण्याची शक्‍यता आहे.

इंडियन बॅंक असोसिएशन (आयबीए)ने प्रस्तावित केलेल्या 2 टक्के पगारवाढीचा निषेध म्हणून संपाची हाक देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी बुधवार, दि. 30 मे आणि गुरुवार, दि. 31 मे रोजी संप पुकारला आहे. तसेच मुंबईतील फोर्ट भागात असलेल्या स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेसमोर काही बॅंक कर्मचारी निदर्शने करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

उच्च वेतनासाठी देशभरातील बॅंक सलग दोन दिवस बॅंकांचे कामकाज बंद राहिल्यास एटीएमवरही त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. महिन्याचा शेवटचा दिवस “पगाराचा’ असल्यामुळे अनेकांना वेतन काढताना अडचणी येऊ शकतात. बॅंकांचे ऑनलाईन ट्रान्झॅक्‍शन सुरळीत सुरु राहणार असले तरी बॅंकांमधील व्यवहारांवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. सध्या ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात करण्यात येतात. त्यामुळे ते सुरळीत सुरु राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या संपामध्ये बॅंक कर्मचाऱ्यांच्या 9 संघटनांनी सहभाग घेतला आहे. या संघटनांची मुख्य संघटना असलेल्या युनायटेड युनियन फोरम ऑफ बॅंक युनियन’ (यूएफबीयू)ने हा संप पुकारला आहे. एटीएमचे सुरक्षारक्षकही या संपात सहभागी होणार असल्याचे ऑल इंडिया एम्प्लॉई असोसिएशनचे अध्यक्ष राजेन नागर यांनी सांगितले. दरम्यान, मागच्या वेळी झालेल्या पगारवाढीमध्ये जवळपास 15 टक्के पगारवाढ देण्यात आली होती. ही पगारवाढ 1 नोव्हेंबर 2012 ते 31 ऑक्‍टोबर 2017 या कालावधीसाठी करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)