बॅंकांकडून 2.33 लाख कोटींची वसुली 

रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर किंवा इतर अधिकारी जेव्हा अर्थव्यवस्थेवर वृत्तमाध्यमांच्याद्वारे बोलतात त्यावर संसदेत प्रतिक्रिया व्यक्‍त करणे बरोबर होणार नाही. 
अरुण जेटली 
केंद्रीय अर्थमंत्री 

नयी दिल्ली: सार्वजनीक क्षेत्रातील बॅंकांनी गेल्या चार वर्षांत तब्बल 2.33 लाख कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली केली असल्याचे अर्थराज्यमंत्री प्रताप शुक्‍ला यांनी संसदेत सांगितले. मात्र, या काळात बॅंकांना 32939 कोटी रुपयांचे कर्ज निर्लेखीत करावे लागले.

ते म्हणाले की, ताळेबंद सुधारण्यासाठी बॅंकांना काही कर्ज निर्लेखित करावे लागते. मात्र, तरीही त्या कर्जाच्या वसुलीसाठी बॅंकांचे प्रयत्न चालू असतात. त्यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी बॅंकांनी अधिक कर्ज दिले, त्याचबरोबर काही घोटाळे झाले या कारणामुळे बॅंकांच्या न वसूल होणाऱ्या कर्जाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. काही लोक ठरवून कर्ज बुडवितात. त्यांच्याकडे आता बॅंकांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात बॅंका मजबूत होतील आणि त्याची कर्जपुरवठा करण्याची क्षमता वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संसदेतच बोलताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ठरवून कर्ज बुडविलेल्यांच्या विरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी जोरदार मोहीम सुरू केली असल्याचे सांगितले. आतापर्यंत अशा लोकाविरोधात बॅंकांनी 2500 तक्रारी पोलिसात दाखल केल्या आहेत. 9363 इतके खटले दाखल केले आहेत. त्याचबरोबर अशा कर्ज घेणाऱ्यांना रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार पाच वर्षे कर्ज दिले जाणार नाही. त्याचबरोबर अशा लोकांचे नाव संबंधित वेबसाईटवर टाकण्यात आली आहेत, असे ते म्हणाले.
68 कंपन्यांकडे 6.29 लाख कोटी रुपयांचे खराब कर्ज आहे. त्यातील 95 कंपन्याकडे 1000 कोटीपेक्षा जास्त कर्ज आहे. मात्र देशातील शेतीतील वसूल न होणारे कर्ज केवळ 1.02 लाख कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.
एटीएम बंद होणार नाही

अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्‍ला यांनी हेही स्पष्ट केले की, सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांची काही एटीएम बंद करण्याची कसलीही योजना नाही. देशात 2.38 लाख एटीएम कार्यरत असून ही आगामी काळात नियमितरित्या कार्यरत राहण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)