बॅंकांकडून व्याजदरात वाढ सुरू 

मुंबई: या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे, पण त्या अगोदरच बॅंकांनी व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. रुपया आणि क्रूडमुळे महागाई वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करणार असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी एचडीएफसी बॅंकेने किरकोळ कर्जावरील व्याजदरात म्हणजे पीएमएलआरमध्ये 0.10 टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे. त्यामुळे या बॅंकेच्या विविध किरकोळ कर्जावरील व्याजदर आता 8.80 ते 9.05 टक्‍क्‍यांच्या दरम्यान होणार आहेत.
या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शनिवारी पंजाब नॅशनल बॅंकेने आपल्या किरकोळ कर्जावरील व्याजदर ठरविणाऱ्या दरात म्हणजे एमसीएलआरमध्ये 0.2 टक्‍के वाढ करून तो आता 8.2 टक्‍के केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)