बुलेट ट्रेनला मिळणार स्वदेशी टच

कोलकता :  सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड बुलेट ट्रेनसाठी सुटे भाग बनवण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी जपानच्या हिताची कंपनीबरोबर बीईएमएलने करारही केल्यामुळे आहे. त्यामुळे भविष्यात भारतात धावणाऱ्या बुलेट ट्रेनला स्वदेशी सुटे भाग मिळण्याची शक्यता आहे.

बीईएमएल ही संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी सरकारी कंपनी आहे. बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान अत्यंत किचकट आहे. त्यातील काही भागांचे स्वदेशीकरण करण्यास आम्ही उत्सुक आहोत. हळूहळू पूर्ण तंत्रज्ञान आत्मसात करता येईल, असे बीईएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. के. होटा यांनी म्हटले आहे.

-Ads-

भारतीय उद्योजक महासंघाच्या  कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘सरकारने मागणी नोंदवल्यानंतर आम्ही उत्पादनाला सुरुवात करू. या प्रकल्पासाठी १.१ लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे,’ असे त्यांनी सांगितले.  मुंबई ते अहमदाबाद मागार्वर धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या २४ गाड्यांना मिळून २४० डबे असणार आहेत. त्यातील दहा डबे भारतीय बनावटीचे असावेत, असे प्राथमिक नियोजन आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)