बुलेट ट्रेनला असणार ट्रॅक फ्रॅक्‍चर डिटेक्‍शन सिस्टीम

अहमदाबाद – मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या नियोजित बुलेट ट्रेनच्या मार्गावर कोठे रूळाची मोडतोड झाली आहे किंवा कसे हे तपासणारी रेल ट्रॅक फ्रॅक्‍चर डिटेक्‍शन सिस्टीम बसवली जाणार आहे. अशा प्रकारची सिस्टीम रेल्वे मध्ये प्रथमच वापरली जाणार आहे. त्यामुळे या रेल्वेचा प्रवास अत्यंत सुरक्षित बनणार आहे. बुलेट ट्रेन ताशी 320 किमी या वेगाने धावणार असल्याने त्या मार्गावर अशी सुरक्षा सिस्टीम असणे अत्यंत अगत्याचे होते असे संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले.

इलेक्‍ट्रीक कंट्रोल सर्किटच्या सहाय्याने संपुर्ण रेल्वे मार्गावर ही सिस्टीम कार्यरत असेल. या मार्गावर रेल्वे ट्रॅकला कुठेही जरा जरी तडा गेला तरी त्याची माहिती या सर्किटच्या सहाय्याने कंट्रोल रूमला कळवली जाईल. त्याचे लोकेशनही त्याचवेळी तेथे दिसेल. त्यामुळे तेथे जाऊन त्वरीत रूळ बदलण्याचे काम करणे तंत्रज्ञांना शक्‍य होणार आहे. ही सेवा कार्यरत करण्यासाठी प्रत्येक किमीला किती खर्च येईल त्याचा हिशोब करण्याचे काम सध्या सुरू आहे.

सुमारे 1 लाख 10 हजार कोटी रूपये इतका खर्च असणारा हा प्रकल्प ऑगस्ट 2022 मध्ये पुर्ण करण्याची योजना आहे. रोज या रेल्वेद्वारे 17 हजार 900 प्रवाशांची या मार्गावर ने आण केली जाणार आहे. या मार्गाच्या फिजीबिलीटी अहवालाचे काम या आधीच पुर्ण झाले आहे. या मार्गावर रोज तीन बुलेट ट्रेन्स धावणार आहेत. या मार्गावर ठाणे आणि साबरमती या दोन ठिकाणी मेंटेनन्स डेपो असणार आहेत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)