बुलेट ट्रेनबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

मुंबई : एकदा नेटवर्क तयार झाले, की त्याचा फायदा सर्वांना मिळतो. मुंबई ते अहमदाबादनंतर आता मुंबई ते पुणे आणि मुंबई ते नाशिक हा बुलेट ट्रेन मार्ग केला पाहिजे, असे आम्ही केंद्र सरकारला सांगितले आहे. दरम्यान, या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून पाहण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

विधानसभेत ते शुक्रवारी बोलत होते.  दरम्यान, बुलेट ट्रेन प्रकल्पातून राज्यात किमान ३३ हजार कोटींची भांडवली गुंतवणूक निर्माण होणार आहे. जपानच्या या वित्तीय पुरवठ्यावर, या प्रकल्पातील तंत्रज्ञानही आपल्या देशाला उपलब्ध होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे देशातील सिमेंट, स्टील या क्षेत्रांना फायदा होईल. देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. तसेच या वित्त पुरवठ्याच्या उपलब्धतेमुळे बुलेट ट्रेनचे तिकिट हे सर्वसाधारण रेल्वेसारखेच ठेवणे शक्य होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)