बुलेट ट्रेनच्या विरोधातील मोर्चाला शिवसेनेचा पाठिंबा

मुंबई: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला जोरदार विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेने बुलेट ट्रेनविरोधी कृती समितीने आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा दिला असून या मोर्चात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या या निर्णयामुळे पालघरमध्ये भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

बुलेट ट्रेन विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी समितीची भूमिका जाणून घेत त्यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. भूमी अधिकार समितीच्यावतीने येत्या ३ जून रोजी पालघरमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला असून शिवसेनाही पालघरमध्ये रस्त्यावर उतरणार आहे.

स्थानिक लोकांचा जमीन अधिग्रहणाला विरोध असेल तर शिवसेना त्यांच्या पाठिशी उभी राहिल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी कृती समितीला दिले आहे. या मोर्चाला मनसेने या आधीच पाठिंबा दिला आहे. त्यात शिवसेनेनेही पाठिंबा जाहीर केल्यानं भाजपसमोरची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)