बुलेट ट्रेनच्या पूल आणि बोगद्यांचा 80 टक्के आराखडा पूर्ण

शिमला (हिमाचल प्रदेश) – देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम पूर्ण वेगाने चालू असून पूल आणि बोगद्यांच्या आराखड्याचे काम 80 टक्के पूर्ण झाल्याची माहिती एका वरिष्ठ आधिकाऱ्याने दिली आहे. या बाबतीतील जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेसही सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांनी गेल्यावर्षी पायाभरणी केलेला हा प्रकल्प सन 2022 मध्ये पूर्ण होणार आहे. ही बुलेट ट्रेन अहमदाबाद आणि मुंबई या दोन शहरांमधील सुमारे 500 किमी अंतर 3 तासांहून कमी वेळात पार करणार आहे. या दरम्यानच्या 12 स्टेशन्सपैकी 4 महाराष्ट्रात आणि 8 गुजरातमध्ये आहेत. भारतीय रेल्वे आणि जपानमधील शिनकान्सेन टेक्‍नॉलॉजीचा हा संयुक्त प्रक्‍ल्प आहे.

दिल्ली, मुंबई आणि जपानमधील इंजिनीयर्सनी या मार्गावरील पूल आणि बोगद्यांच्या आराखड्याचे 80 टक्के काम पूर्ण केल्याचे या प्रकल्पचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी सांगितले आहे.

दोन्ही राज्यांतील मार्ग आणि माती सर्वेक्षण आणि भूमी अधिग्रहण कामे जोरात चालू आहेत. हा मार्ग महाराष्ट्रातील 108 गावांमधून जात असून त्यापैकी बहुतेक गावे पालघर जिल्ह्यात आहेत. 17 गावातील भूमी अधिग्रहणाबाबत सूचना जारी केल्या असून जमीन मालकांना त्याबाबत कळवल्याचे अणि त्यांना बाजारभावापेक्षा चांगली किंमत देणार असल्याचे अचल खरे यांनी सांगितले.

संपूर्ण प्रकल्प आग आणि भूकंपनिरोधक असून भूकंपप्रवण क्षेत्रात सिस्टोमीटर्स बसवण्यात येणार आहेत. ट्रेनवा वेग हा वाऱ्याच्या वेगावर अवलंबून राहणार असल्याचे अचल खरे यांनी स्पष्ट्‌ केले आहे. सेकंदाला 30 मीटर्सपेक्षा अधिक वेगाने वारे वाहत असल्यास ट्रेन थांबविण्यात येणार आहे.

320 सेकंदात ट्रेन ताशी 320 किमी वेग पकडणार आहे. या दरम्यान तिने 18 किमी अंतर पार केलेले असणार आहे. प्रवासी बांद्रा कुर्ला कॉप्लेक्‍सवरून ठाण्यला 10 मिनिटात तर विरारला 24 मिनिटात पोहचतील. गर्दीच्या वेळी 3 ट्रेन आणि कमी गर्दीच्या वेळी दोन ट्रेन चालवण्याची योजना आहे. मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान काही ट्रेन मर्यादित स्टेशन्सवर तर काही सर्व स्टेशन्सवर थांबतील. या मार्गावर प्रत्येक दिशेने 35 अशा एकूण 70 फेऱ्या होणार असून दररोज सुमारे 40,000 प्रवाशांना याचा फायदा होईल, असे अचल खरे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)