बुलढाणा येथील जातीयवाद्यांवर कठोर कारवाई करा

मंचर-रूईखेड मायबा (ता. जि. बुलढाणा) येथे एका चर्मकार महिलेस नग्न करून मारहाण करणाऱ्या जातीयवादी नराधमांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्याकडे करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र बलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव थोरात यांनी दिली. किरकोळ कारण पण मोठ्या हिंसक जातीयवादी भावनेतून चर्मकार महिलेला विवस्त्र करून मारहाण केली. तसेच तिच्या पतीस आणि मुलानांही बेदम मारहाण करण्यात आली. आणि उलट त्यांच्यावरच चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खोटा गुन्हा त्वरीत रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र बलुतेदार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकरणी 21 आरोपी विरूद्ध ऍट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर काहींना अटक केली असून 8 ते 10 आरोपी फरार आहेत. या झालेल्या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोंपींनी बैल चोरल्याची खोटी तक्रार दिली असून चर्मकार कुटुंबियांच्या विरोधात भादवी कलम 457, 380 व 511 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खोटा गुन्हा त्वरीत रद्द करावा आणि चर्मकार महिलेस नग्न करून मारहाण करणाऱ्या जातीयवादी नराधमांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्याकडे करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र बलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष थोरात यांनी दिली. फुले, शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात एका चर्मकार महिलेला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या अमानवी घटनेचा निषेध थोरात यांनी केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)