बुलडाण्यात भर वर्गात पालकांची शिक्षकाला मारहाण 

बुलडाणा: बुलडाण्यातील चिखलीमधल्या तक्षशीला विद्यालयात विद्यार्थ्याच्या पालकांनी थेट वर्गात घुसून शिक्षकाला बेदम मारहाण केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या मुलाला कडक शब्दात समज दिल्याच्या रागातून पालकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्याचे आरोपी वडील आणि एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
जेवणाच्या सुटीत दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याचे सातवीतील विद्यार्थ्याशी भांडण झाले. याचा राग मनात ठेवून सातवीच्या विद्यार्थ्याने शाळेबाहेरील चार ते पाच मुले आणून दहावीतील विद्यार्थ्याला मारहाण केली.याची तक्रार संबंधीत विद्यार्थ्यांने शिक्षक वळसे यांच्याकडे केली. तेव्हा शिक्षकांनी सातवीतील विद्यार्थ्याला बोलावून त्याला कडक शब्दात समज दिली. त्यानंतर विद्यार्थ्याने ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली.
दरम्यान, दुपारी सुनील वळसे दहावीच्या वर्गामध्ये तास घेत असताना संबंधित विद्यार्थ्याचे वडील चार ते पाच जणांना घेऊन शाळेत शिरले. त्यांनी थेट वर्गात जाऊन सुनील वळसे यांना जाब विचारत त्यांनी लाथा-बुक्‍यांनी मारहाण करायला सुरुवात केली. वर्गातील गोंधळ एकूण शेजारील वर्गातील शिक्षक भांडण सोडवायला आले. त्यावेळी आरोपींनी सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार अचानक सुरु असताना वर्गातील विद्यार्थीही घाबरुन सैरावैरा वर्गाबाहेर पळाले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)