बुलंदशहर हिंसाचार : ‘धार्मिक वाद आणखी किती पित्यांचे बळी घेणार’

बुलंदशहर – ‘मी या देशाचा चांगला नागरिक व्हावे, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. समाजात धर्माच्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचारविरोधात ते नेहमी मला हेच सांगायचे. परंतु, आज हिंदू-मुस्लिम वादात मी माझ्या वडिलांना गमावले. हे धार्मिक वाद आणखी किती पित्यांचे बळी घेणार आहे?’, असा सवाल सुबोध कुमार सिंह यांच्या मुलाने विचारला आहे.

-Ads-

उत्तरप्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील महाव गावात गोहत्येच्या अफवेमुळे उसळलेल्या हिंसाचारात एक पोलिस निरीक्षक आणि एक युवक ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहेत. सुबोध कुमार सिंह असे मृत्यू झालेल्या पोलिस निरीक्षकाचे आहे. सुबोध कुमार सिंह यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबियांना मानसिक धक्काच बसला. यावेळी त्यांच्या मुलाने जातीय तणावावरून संतप्त प्रतिक्रिया दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)