बुलंदशहर हिंसाचार : दोघांना अटक तर ६० जणांविरुद्ध तक्रार दाखल 

बुलंदशहर – उत्तरप्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील महाव गावात गोहत्येच्या अफवेमुळे उसळलेल्या हिंसाचारात एक पोलिस निरीक्षक आणि एक युवक ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी छापेमारी करण्यास सुरुवात केली आहे. या घटनावेळी व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओंच्या आधारे पोलिसांनी छापेमारी केली आहे. यानुसार पोलिसांनी आतापर्यंत २ जणांना अटक केली तर ४ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच ६० अज्ञात लोकांविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक योगेश राज यांना पोलिसांनी मुख्य आरोपी सांगितले आहे.

दरम्यान, बुलंदशहर जिल्ह्यातील महाव गावात गोहत्येचा प्रकार उघडकीला आल्याचा दावा करण्यात आल्यानंतर कारवाई करण्याची मागणी करीत जमावाने पोलिस चौकीवरच हल्ला चढवला. जमावाने तुफान दगडफेक आणि जाळपोळ केली. यामध्ये सायना पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सुबोध कुमार हे ठार झाले आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)