बुरुंजवाडी शाळेला ई लर्निंग संच भेट

शिक्रापूर – बुरुंजवाडी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ऍम्पासेट कंपनीच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत लोकसहभागातून 1 लाख रुपये किंमतीचे शाळेसाठी ई-लर्निग संच आणि सौरऊर्जा डिजिटल संचचे भेट देण्यात आले आहे.

बुरुंजवाडी (ता. शिरुर) येथील शाळेस या वस्तू ऍम्पासेट कंपनीचे संचालक चेतन शहा यांच्या हस्ते आणि बाळासाहेब टेमगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आल्या. यावेळी बोलताना चेतन शहा म्हणाले, बुरुंजवाडी जिल्हा परिषद शाळेसाठी आगामी काळात अजून साहित्य संच उपलब्ध करून मदत केली जाईल. याप्रसंगी याप्रसंगी सरपंच पूनम दत्तात्रय टेमगिरे, उपसरपंच विनोद टेमगिरे, माजी सरपंच विलास नळकांडे, दत्तात्रय टेमगिरे, शालेय समितीचे अध्यक्ष रविंद्र उमाप, उपाध्यक्ष राजेंद्र रुके, जनाबाई सरोदे, मनोज शितोळे, मेघा नळकांडे, मुख्याध्यापक दादाभाऊ नळकांडे, अण्णासाहेब गैंद यांसह आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप गिते यांनी केले. तर दिलीप कुसाळे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)