बुरुंजवाडीत स्वच्छ भारत अभियान मोहीमेस सुरवात

शिक्रापूर-बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथे स्वच्छ भारत अभियान मोहीम कार्यक्रम ही योजना सुरु करण्यात आली असून, ही योजना राबविण्यासाठी पावर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड शिक्रापूर या कंपनीच्या माध्यमातून कंपनीचे शिष्टमंडळ गावात सहभागी होऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
बुरुंजवाडी येथे स्वच्छ भारत अभियान मोहीमेस सुरवात करण्यात आली असून या कार्यक्रमाच्या वेळी कंपनीच्या माध्यमातून गावात स्वच्छता राखण्यासाठी कचराकुंड्या साहित्य आणि काही झाडे ग्रामपंचायतीस भेट देण्यात आले. हा कार्यक्रम कंपनीचे मुख्य अधिकारी हिमांशू रावत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असून याप्रसंगी सरपंच पूनमताई टेमगिरे, पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उपअभियंता उद्धव धापसे, कंपनीचे अधिकारी स्मृती गॅंग, श्रृती त्रिपाठी, उपसरपंच विनोद टेमगिरे, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक कालिदास नळकांडे, माजी सरपंच, लताबाई टेमगिरे, सोसायटीचे अध्यक्ष अनिल टेमगिरे, तंटामुक्त समितीचे माजी उपाध्यक्ष महादू नळकांडे, सुखदेव नळकांडे, ग्रामविकास अधिकारी के. एम. शिंदे, धर्मेश गायकर, राजेंद्र मोरे, विवेकानंद पवार यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय टेमगिरे यांनी केले तर उपसरपंच विनोद टेमगिरे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)