बुरुंजवाडीत बाल आनंद मेळावा उत्साहात

शिक्रापूर-बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने बाल आनंद मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते.
बुरुंजवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बालआनंद मेळाव्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी गाणी, नृत्य, चुटकुले, विनोदी नाटके तसेच इत्यादी कलाअविष्कार सादर केले. यावेळी गावातील अबालवृद्ध, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बालचमुंच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत अनेकांनी बक्षिसांचा वर्षाव केला. यावेळी आलेल्या बक्षिसांच्या माध्यमातून शाळेसाठी 63 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला. यावेळी माजी सरपंच बाळासाहेब टेमगिरे, सरपंच पूनम टेमगिरे, उपसरपंच विनोद टेमगिरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र उमाप, उपाध्यक्ष दादासाहेब रुके, लक्ष्मण गावडे, विलास नळकांडे, उद्योजक दीपक टेमगिरे, दत्तात्रय टेमगिरे तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. तर शाळेतील मुलांच्या कलागुणांना या माध्यमातून वाव मिळत असल्याचे मत डॉ. अविनाश रुके यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक दादाभाऊ नळकांडे यांनी केले तर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र उमाप यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)