बुरख्यावरील बंदी हे मानवाधिकारांचे उल्लंघन…! 

संयुक्‍त राष्ट्राची फ्रान्सवर टीका

न्यूयॉर्क: फ्रान्सने मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालणे म्हणजे मानवाधिकारांचे उल्लंघन आहे, अशी टीका संयुक्त राष्ट्राने केली आहे. त्यामुळे बुरख्यावर बंदी घालण्याच्या या कायद्याचा फ्रान्सने फेरविचार करण्याची मागणीही संयुक्‍त राष्ट्राने केली आहे. संयुक्‍त राष्ट्राच्या मानवाधिकार समितीने मंगळवारी याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुरक्षेच्या दृष्टीने तसेच समाजात एकत्र राहण्याच्या दृष्टीने चेहरा झाकण्याला मनाई करणे आवश्‍यक आहे, असा युक्तिवाद फ्रान्सने केला होता. मात्र हा युक्तिवाद आम्हाला अमान्य आहे, असे या समितीने म्हटले आहे. बुरख्यावर बंदी घालण्याच्या कायद्याबाबत पुरेसा युक्तिवाद करण्यात फ्रान्सला अपयश आले आहे. तसेच याबाबत काय कारवाई केली, याची माहिती 180 दिवसांत फ्रान्सने द्यावी, अशी सूचनाही या समितीने केली आहे. या संबंधात फ्रान्सकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

फ्रान्समध्ये 2011 पासून मुस्लिम महिलांना बुरखा घालण्यास बंदी करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी बुरखा घातल्यास दंड वसूल करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी पूर्ण चेहरा झाकणारा बुरखा घातल्यास त्या महिलेस 150 युरो म्हणजे दहा हजार रुपये दंड लावला जातो. तसेच चौकशीसाठी महिलेला पोलिस ठाण्यात नेले जाऊ शकते, अशी या कायद्यात तरतूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)