बुमराह आयपीएलला मुकणार?

नवी दिल्ली: इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांनी पुरेशी विश्रांती मिळायला हवी, अशी इच्छा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपुर्वी व्यक्त केली होती. त्याची ही इच्छा पूर्ण होणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. त्यानुसार भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमरा याला विश्रांती देण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) करत असून बुमराहचा वापर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड येथिल एकदिवसीय सामन्यांबरोबरच इंडियन प्रिमियर लिगमध्ये कमीत कमी प्रमाणात करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे.

विश्‍वचषका पुर्वी मार्च महिन्या पर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंद दौऱ्यानंतर मायदेशात पुन्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका खेळून आयपीएल स्पर्धा खेळणार आहे. त्यामुळे सध्याच्या संघातील अव्वल वेगवान गोलंदाजांवर भार पदण्याची शक्‍यता आहे आणि या व्यग्र वेळापत्रकामुळे त्यांना दुखापत होण्याची शक्‍यता ही नाकारता येत नाही. त्यामुळे भारतीय संघातील जलदगती गोलंदाजांवर या व्य्ग्रतेचा किती भार पडणार आहे, याबाबतचा तपशील बीसीसीआयने मागवला आहे. त्यानंतर 25 वर्षीय बुमराहला विश्रांती देण्याच्या मुद्यावर मुंबई इंडियन्स सह संघ व्यवस्थापनाशीची चर्चा करणार असल्याचेही बीसीसीआय च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. विश्‍वचषकासाठी बुमराह तंदुरूस्त राहावा म्हणून बीसीसीआय काळजी घेते आहे असे सांगितले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआय शी बोलताना सांगितले की, विराटने काही दिवसांपुर्वी झालेल्या बैठकीत आमच्याकडे व्यक्त केलेली चिंता अगदी बरोबर आहे. कदाचित तोही आयपीएलच्या काही सामन्यांतून विश्रांती घेऊ शकतो. तो त्याबद्दल संघामालकांशी बोलतही असेल. बुमराहबद्दल बोलायचे झाले तर, सहाय्यक स्टाफला आम्ही त्याच्यावर असलेल्या कामगिरीच्या जबाबदारीचा तपशील तयार करायला सांगितला आहे. त्यानंतर आम्ही मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर त्याच्या आयपीएल मधिल सहभागा बद्दल सांगता येइल. तसेच तो तंदुरुस्त असेल, तर मुंबई इंडियन्ससाठी तो काही महत्त्वाचे सामने खेळू शकतो. आयपीएलचे वेळापत्रक प्रचंड धावपळीचे असते. त्यामुळे विश्‍वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून मुंबई इंडियन्सनेच त्याला विश्रांती दिली तर ते उत्तम ठरेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका आणि न्यूझीलंड दौरा असे भारतीय संघाचे वेळापत्रक आहे. आयपीएल संपल्यानंतर त्वरित विश्‍वचषक स्पर्धा सुरू होत आहेत. 30 मे ते 14 जुलै या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. त्यामुळे अनेक देशांनी आपले महत्वाच्या खेलाडूंना आयपीएल मध्ये खेळण्यापासून रोख लावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)