बुमराहला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यात विश्रांती

बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी

नवी दिल्ली: भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा असलेल्या जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलिया विरोधात होणाऱ्या आगामी एकदिवसीय मालिका तसेच न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी मोहम्मद सिराज याची वर्णी लावण्यात आली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळल्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथे भारतीय संघ पाच एकदिवसीय आणि तीन ट्‌वेंटी-20 सामने खेळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 21 बळी मिळवत भारताच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. गोलंदाजांवर असलेली जबाबदारी पाहता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्यांना योग्य ती विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. मोहम्मद सिराजला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात बुमराहच्या जागी घेण्यात आल्याचे बीसीसीआयने यावेळी स्पष्ट केले आहे.

याबरोबरच, पंजाबचा जलदगती गोलंदाज सिद्धार्थ कौल यालाही न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघ यापूर्वीच जाहीर केला होता. मात्र, मे महिन्यापासून सुरू होत असलेली विश्‍वचषक स्पर्धा आणि त्यापूर्वी होणारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) यामुळे बुमराहवर येणारा ताण लक्षात घेता बीसीसीआयने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, केवळ 12 महिन्यांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा बुमराह आता भारताचा प्रमुख गोलंदाज बनला आहे. कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या भूमीत मिळवलेल्या कसोटी क्रिकेटमधील पहिल्या विजयानंतर जलदगती गोलंदाजांकडे विशेष लक्ष देणे सुरू केले होते. यानंतरच बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात
आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)