बुध-पुसेगाव रस्ता खड्ड्यात

खराब रस्त्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांची मालिका सुरू

– बुध ते पुसेगाव रस्त्याची अवस्था फार बिकट झाली असून रस्त्यामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलाचे कठडे तुटल्यामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद सदस्या व जिल्हा नियोजन समितीच्या महिला सदस्यांच्या निवासस्थानासमोरून हा रस्ता जातो. या रस्त्याची तातडीने दुरस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

फलटण संस्थानकडून औध संस्थानकडे जाणाऱ्या बुध ते पुसेगाव रस्त्याची अवस्था रस्त्यामध्ये खड्डा की खड्डयांमध्ये रस्ता अशी झाली आहे. गेली अनेक वर्ष या रस्त्यावर खर्च करण्यात आला नाही. शेतकऱ्यांना रस्ता क्रॉसिंगसाठी सार्वजनिक बांधकाम खाते हजारो रूपये घेते पण चारीही चक्क मातीने भरून काढते. या रस्त्यावर ठिकठिकाणी चारीतील माती वाहून गेल्यामुळे वाहन चालकांचे कंबरडे मोडत आहे. शेतकऱ्याकडून घेतलेला पैसा कोठे जातो? असा सवाल वाहन चालक करत आहेत. या रस्त्यावर असणाऱ्या पुलांची अवस्था दयनीय झाली असून कठडे तुटले आहेत. यामुळे ठिकाणी अपघात होत आहेत. पुलांची दुरुस्ती करून प्रवाशांचे प्राण वाचवावेत, अशी मागणी होत आहे.

-Ads-

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पुसेगाव येथील परमपूज्य सेवागिरी महाराजांची यात्रा जानेवारी महिन्यात आहे. यात्रेपूर्वी हा रस्ता दुरुस्त केल्यास भाविकांचे हाल होणार नाहीत. पुसेगाव-सातारा रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे सध्या बुध मार्गे सातारा अशी वाहतूक सुरू आहे. यामुळे या मार्गावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे. लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी गोरज मुहूर्त मिळणार, असे असा सवाल प्रवाशी तसेच वाहन चालकांमधून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)