बुध ः ध्वजारोहणप्रसंगी अभयसिंह राजेघाटगे व मान्यवर.

बुध, दि. 16 (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्यदिन बुध व परिसरात मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.
बुधमध्ये ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच अभय सिंह राजेघाटगे यांच्या हस्ते नव्या ग्रामसचिवालयाच्या इमारतीसमोर झाले. तसेच जिल्हा परिषद शाळा, श्री नागनाथ विद्यामंदिर, जिल्हा परिषद शाळा रामोशी वस्ती, ईदगाह माळ, पिरमाळ, करंजओढा, विविध मंडळे, पतसंस्था, डेअरी, सोसायटीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यकम झाले. तसेच पुसेगाव, ललगुण, डिस्कळ, मोळ परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)