बुध ग्रा. पं.मध्ये म. गांधी जयंती साजरी

बुध ः महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करताना सरपंच अभयसिंह राजेघाटगे, मनिषा कुंभार, योगेश ठोंबरे, एस.एस. कांबळे. (छाया ः योगेश फोटोज बुध)

बुध, दि. 2 (प्रतिनिधी) – बुध, ता. खटाव येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच सौ.मनिषा कुंभार, ग्रामपंचायत सदस्य योगेश ठोंबरे, गणेश सातपुते, पोपट जाधव, ग्रामविकास अधिकारी एस. एस. कांबळे, गणेश महामुलकर, योगेश फरकुटे, पनवेलच्या शिवसेनेच्या नेत्या संगीता राऊत, पंकज पवार, ग्रामपंचायत सदस्य, मुधोजी शेती कॉलेजचे विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)