बुधवार पेठेत कुंटणखान्यावर छापा; दोन मुलींची सुटका

पुणे – बुधवार पेठेत कुंटणखान्यावर छापा टाकून दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. यातील एक मुलगी बांग्लादेश व एक कर्नाटकातील आहे.

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील, हवालदार नितीन तरटे यांना बुधवार पेठेतील डायमंड इमारतीत रुपा तमांग व चंदा तमांग या महिला अल्पवयीन मुलींकडून वेश्‍याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून दोन्ही मुलींची सुटका करण्यात आली. या मुलींना वेश्‍याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी रुपा तमांग, चंदा तमांग, संजिदा मुल्ला (पश्‍चिम बंगाल), कुमार तमांग (27, रा. नेपाळ), आलम हक (बांग्लादेश), शांती (पश्‍चिम बंगाल) व अल्पवयीन मुलींबरोबर वेश्‍या गमन करणाऱ्या अनोळखी व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चंदा, संजिदा आणि कुमारला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईवेळी रोख 1500 रुपये, मोबाईल फोन, लाईट बिल, आधारकार्ड आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या मुलींना रेस्क्‍यु होममध्ये ठेवण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, कर्मचारी नामदेव शेलार, प्रमोद म्हेत्रे, राजाराम घोगरे, नितीन तरटे, नितीन लोंढे, रमेश लोहकरे, राजेश उंबरे, नितीन तेलंगे, तुषार आल्हाट, सचिन कदम, प्रदिप शेलार, सचिन शिंदे, सतिष ढोले, रेवणसिध्द नरोटे, सुनील नाईक, नमिता येळे, गितांजली जाधव, कविता नलावडे, अनुराधा ठोंबरे, रुपाली चांदगुडे व फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)