बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकिजमध्ये आग

पुणे – बुधवार पेठतील श्रीकृष्ण थिएटरमध्ये गुरूवारी आग लागून साहित्य खाक झाले. येथील खुर्च्या गॅस कटरने कापून काढताना ही आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ दाखल होत आग आटोक्‍यात आणली. त्यामुळे मोठी हानी टळली.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, या थिएटरमध्ये गॅस कटरने खुर्च्या कापून काढण्याचे काम सुरू होते. यावेळी बाल्कनीतील खुर्च्या कापत असताना सायंकाळी चारच्या सुमारास आग लागली. या आगीने शेजारील खुर्च्यांच्या फोममुळे अचानक पेट घेतला आणि मोठ्या प्रमाणात पसरली. त्यानंतर काम करणारे लोक तेथून बाहेर पळाले. त्यांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. कसबा अग्निशमन केंद्राचे तांडेल अनिल करडे, राजाराम केदारी, हरिश बुंदेले, विठ्ठल अडारी, मंगेश मिळवणे, प्रकाश बुंदेले हे तेथे दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. वीस ते पंचवीस मिनिटांत संपूर्ण आग आटोक्‍यात आणली. मात्र आतील खुर्च्या, फोम, बाहेरून लावलेले फायबरचे पत्रे आणि इतर लाकडी वस्तू जळून खाक झाल्या.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)