बुधवडी येथे सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

कामशेत – बुधवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. केंद्र प्रमुख देवडकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. सातवीच्या मुलांनी भाषणांतून शाळेचे महत्त्व सांगितले. त्यांच्या जीवनाचा पाया या ठिकाणी भक्कम झाला, हे सांगताना लहान-लहान मुले देखील भावुक झाली.

प्रेमापोटी विद्यार्थ्यांनी शाळेस टेबल भेट दिले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनंता टाकळकर, उपाध्यक्ष संतोष टाकळकर, सदस्य पप्पू साबळे, विश्वनाथ टाकळकर, कैलास कालेकर, चंदा पिंगळे, वसंत घरदाले उपस्थित होते.

सरपंच बबन टाकळकर, सदस्य चंदा पिंगळे, संगीता टाकळकर, पोलीस पाटील रविंद्र टाकळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावर्षीचा ग्राम गौरव पुरस्कार शिक्षिका रेखा श. मोरे व पदवीधर शिक्षक अनुजा सु. धस यांना देण्यात आला. रोहिदास पिंगळे, निवृत्ती टाकळकर, मंदाताई टाकळकर यावेळी उपस्थित होते. मुख्याध्यापक ब. स. कोल्हे यांनी प्रास्ताविक, अनुजा धस यांनी सूत्रसंचालन व रे. श. मोरे यांनी आभार मानले. शाळेने सर्वांना स्नेह-भोजन देवून सांगता झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)