बुधवडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांचा निरोप समारंभ

बुधवडी : येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थांच्या सदिच्छा कार्यक्रम प्रसंगी मान्यवर.

कार्ला, (वार्ताहर) – पुणे जिल्हा परिषद बुधवडी शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थांचा सदिच्छा समारंभ उत्साहात करण्यात आला. या वेळी विद्यार्थांनी आपल्या शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला. केंद्र प्रमुख देवडकर यांनी सातवीच्या विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

या वेळी बुधवडी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अनंता टाकळकर, उपाध्यक्ष संतोष टाकळकर, सदस्य पु. पु. साबळे, विश्‍वनाथ टाकळकर, कैलास कालेकर, चंदा पिंगळे, वसंत घरदाळे, रोहिदास पिंगळे उपस्थित होते. पंचायत समितीच्या माजी सदस्या मंदाताई टाकळकर, माजी उपसरंपच निवृती टाकळकर, नवनिर्वाचीत सरंपच बबन टाकळकर, ग्रामपंचायत सदस्या चंदाताई पिंगळे, संगीता टाकळकर, पोलीस पाटील रवींद्र टाकळकर यांचा व ग्रामगौरव पुरस्कार शिक्षिका रेखा मोरे, पदवीधर शिक्षिका अनुजा धस यांचा शालेय समितीच्या वतिने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक कोल्हे यांनी केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)