“बुद्धीचा विकासाबरोबर शिस्त आवश्‍यक’

उरुळी कांचन- बलाचा आणि बुद्धीचा विकास होताना अंगी शिस्तही आवश्‍यक असते. शालेय जीवनात विद्या प्राप्त करत असताना खेळाचाही आनंद घ्या. आपले करिअर खेळाच्या माध्यमातून बनवता आले पाहिजे. कारण जोपर्यंत आपण विद्यार्थी आहोत. तोपर्यंतच हे शक्‍य होते. खेळाबरोबर अंगी शिस्त आणि संयम ही जोपासला पाहिजे तरच आपण यशाची शिखरे गाठू शकू, असे मत उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांनी व्यक्‍त केले. नायगाव (ता. हवेली) येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा सचिव पूनम चौधरी होत्या. यावेळी पुरोगामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब चोरघे, सचिव रंगनाथ कड, पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांनी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी संस्थेचे विश्‍वस्त दत्तात्रय चौधरी, सोनबा चौधरी, पेठ गावचे पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी, अजिंक्‍य चौधरी, विठ्ठल चौधरी, बंडू चौधरी, राघवदास चौधरी, पालक संघाचे उपाध्यक्ष आनंद कांबळे, पालक उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थी व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त एपीआय संतोष चौधरी यांचा सन्मान मुख्याध्यापक आय. एस. मोमीन व पर्यवेक्षक एस. एन. रणदिवे यांनी केला. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. के. ठोंबरे यांनी केले. एम. डी. जाधव यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)