बुद्धिबळ स्पर्धा: पाचव्या फेरीअखेर महाराष्ट्राचा सम्मेद शेटे आघाडीवर 

सम्मेद शेटेचा आंतरराष्ट्रीय मास्टर सत्यप्रग्यान स्वयंगसु याला धक्‍का 
श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा 
पुणे: महाराष्ट्राचा सम्मेद शेटे याने ओरिसाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर सत्यप्रग्यान स्वयंगसु याचा सनसनाटी पराभव करताना 15व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आपली आघाडी कायम ठेवली. तसेच महाराष्ट्राच्या अतुल डहाळेने तमिळनाडूच्या ग्रॅंडमास्टर सुंदरराजन किदांबीला बरोबरीत रोखताना आजच्या दिवसातील आणखी एका खळबळजनक निकालाची नोंद केली. बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 
अश्वमेध सभागृह, कर्वे रोड, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील पाचव्या फेरीत महाराष्ट्राचा सम्मेद शेटे याने ओरिसाच्या दुसऱ्या मानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर सत्यप्रग्यान स्वयंगसुला पराभवाचा धक्‍का देत आघडीच्या स्थानाची निश्‍चिती केली. सम्मेदने किंग पॉन पद्धतीने सुरुवात करत सत्यप्रग्यानवर 45 चालींमध्ये मात केली व सनसनाटी निकाल नोंदविला. या विजयामुळे सम्मेद शेटेने एकूण पाच गुणांची कमाई केली. 
आजच्या अन्य लढतीत तामिळनाडूच्या हरिकृष्णा ए. याने रेल्वेच्या आयएम रत्नाकरनला बरोबरीत रोखताना 4.5 गुणांसह संयुक्‍त दुसऱ्या स्थानाची निश्‍चिती केली. तमिळनाडूच्या मुथय्या एएल याने महाराष्ट्राच्या हेरंब भागवतवर विजय मिळवताना 4.5 गुणांसह संयुक्‍त दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. महाराष्ट्राच्या आयएम विक्रमादित्य कुलकर्णीने इंद्रजीत महिंद्रकरचा पराभव करीत 4.5 गुणांसह संयुक्‍त दुसरे स्थान मिळविले. तसेच महाराष्ट्राच्या आयएम समीर काठमळेने वेदांत पिंपळखरेवर सहज मात केली. तर एजीएम किरण पंडितरावने तनिषा बोरमाणीकरचा पराभव करताना आपली आगेकूच कायम राखली. 
 
सविस्तर निकाल- 
पाचवी फेरी – (व्हाईट व ब्लॅक या क्रमानुसार)- 
सम्मेद शेटे (महा-5गुण) वि.वि. आयएम सत्यप्रग्यान स्वयंगसु (ओडिसा-4 गुण); हरिकृष्णा (तामिळनाडू-4.5 गुण) बरोबरी वि. आयएम रत्नाकरन के (रेल्वे-4.5 गुण); मुथय्या एएल (तामिळनाडू-4.5 गुण) वि.वि. हेरंब भागवत (महा-4 गुण); एफएम अमेय ऑडी (गोवा-4.5 गुण) वि.वि. एफएम एस.जी.जोशी (महा-3.5 गुण); एफएम मट्टा विजय कुमार (आंध्रप्रदेश-4.5 गुण) वि.वि. आयएम अभिषेक केळकर (सीआरएसबी-3.5 गुण); इंद्रजीत महिंद्रकर (महा-3.5 गुण) पराभूत वि. आयएम विक्रमादित्य कुलकर्णी (महा-4.5 गुण); रित्वीज परब (गोवा-4.5 गुण) वि.वि. संजीव नायर (महा-3.5 गुण); अतुल डहाळे (महा-4 गुण) बरोबरी वि. ग्रॅंडमास्टर सुंदरराजन किदांबी (तामिळनाडू-4 गुण), आयएम समीर काठमळे (महा-4 गुण) वि.वि. वेदांत पिंपळखरे (महा-3.5 गुण), कपिल लोहाना (महा-4 गुण) वि.वि. आयुष महाजन (महा-3 गुण), एजीएम किरण पंडितराव (सीआरएसबी-4 गुण) वि.वि. तनिषा बोरमाणीकर (महा-3 गुण), स्वप्नील कांत (महा-3 गुण) पराभूत वि.सिद्धांत गायकवाड (महा-4 गुण), डब्ल्युआयएम चंद्रेयी हजरा (पश्‍चिम बंगाल-4 गुण) वि.वि. रोहित मोकाशी (महा-3 गुण), पंकीत मोटा (महा-4 गुण)वि.वि. एएफएम अर्णव नेहेते (महा-3 गुण); एल.पीखाडिलकर (महा-3.5 गुण) बरोबरी वि. आर्यन शहा (महा-3.5 गुण). 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)