बुद्धांचे शांततेचे तत्वज्ञान जगाला मार्गदर्शक – सारंग आव्हाड

पिंपरी  – आज संपूर्ण जगाला बुद्धांचे शांततेचे तत्वज्ञान मार्गदर्शक आहे, असे मत पोलीस उपायुक्‍त सारंग आव्हाड यांनी व्यक्‍त केले. भारतीय बौद्ध महासभेच्या पिंपरी-चिंचवड शहर अंतर्गत एचए कॉलनी वार्ड शाखा व एचए कॉलनी बौद्धजन मंडळ यांच्या विद्यमाने वर्षावास समाप्ती कार्यक्रम रविवार दि. 28 ला झाला. प्रमुख पाहुणे म्हणून आव्हाड होते. बौद्ध महासभेचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड अध्यक्षस्थानी होते.

विजय गायकवाड म्हणाले, चार महिन्यांपासून जिल्ह्यातील बुद्ध विहारांमध्ये वर्षावासाचा हजारो बौद्ध बांधवांना लाभ झाला. संस्थेच्या धार्मिक कार्यक्रमांना दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याचे सर्व श्रेय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आहे. सारंग आव्हाड यांचा भारतीय राज्य घटनेची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. महासभेच्या विभागीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल विजय गायकवाड यांचा देखील सत्कार करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव भगवान शिंदे, भीमराव ढोबळे, कोषाध्यक्षा सुजाता ओव्हाळ, पुणे शहराध्यक्षा रोहिणी टेकाळ, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष डी. व्ही. सुरवसे, पिंपरीचे माजी महापौर महंमदभाई पानसरे, भारिप बहुजन महासंघ शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शहराध्यक्ष संतोष जोगदंड सरचिटणीस दिलीप कदम, सुधाकर वाळके, पी. जी. भोसले, डी. बी. रणपिसे, किशोर गवळी, अशोक यादव, श्रावण जोगदंड, रामचंद्र अचलकर यावेळी उपस्थित होते. अशोक सरतापे यांनी प्रास्ताविक केले. फुलचंद जोगदंड यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद जाधव यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)