“बी स्कूल्स’मध्ये सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अग्रस्थानी

पुणे – नुकत्यात दिल्ली येथै झालेल्या एका समारंभात जागरण डॉट कॉम आणि कन्टार टी एन स या जागतिक संशोधन संस्थेने पुण्यातील सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला पश्‍चिम भारतातील उत्तम बी स्कूल्सच्या यादीमध्ये पहिल्या चार मध्ये स्थान मिळाल्याबद्दल प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक शेखर सुमन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सुमन म्हणाले की, विद्यार्थ्याना उच्च शिक्षण देण्यामागे उत्तम माणूस व आदर्श नागरिक तसेच जागरुक समाज बनविणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. शिक्षणाचा हेतू आणि गेली अनेक वर्षे त्यामध्ये झालेले सकारात्मक बदल या विषयावर सुमन यांनी आपले मत मांडले.

-Ads-

हा पुरस्कार जागरण जोसचे कार्यकारी संचालक भरत गुप्ता यांच्या उपस्थितीमध्ये प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह या स्वरूपात देण्यात आला. हा पुरस्कार सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. संजय चोरडिया यांनी स्वीकारला.हा पुरस्कार स्वीकारल्यावर डॉ.संजय चोरडिया म्हणाले की, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ही नेहमीच दर्जेदार शिक्षण व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर भर देऊन शिक्षण देणारी पद्धती अंमलात आणत असते.

आता जगभरात व्यवस्थापन हे शिक्षणप्रवाह आणि प्रशिक्षण हे उत्तेजन देणारे मोजमाप म्हणून मानले जाते. सूर्यदत्त ग्रुप ही चांगली उदयास आलेली व नावाजलेला उत्तम ब्रॅन्ड, दर्जेदार व्यवस्थापन शिक्षण देणारी व औद्योगिक नेतृत्व असलेली शैक्षणिक संस्था आहे. नवकल्पना असलेले अभ्यासक्रम, सामाजिक, भौगोलिक व बहुभाषीय हायब्रीड ग्रुपचे फायदे देऊन महत्त्वाकांक्षी व आकाशात उंच भरारी घ्यावयाची आहे अशा विद्यार्थ्यांना कार्पोरेट जगताकडे चढाई करण्यास प्रोत्साहित करणारी आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी माफक दरात दर्जेदार शिक्षण देणे व स्वयं सारख्या सरकारने सुरू केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व या विषयी माहिती डॉ. संजय चोरडिया यांनी दिली. सुषमा चोरडिया यांनी सूर्यदत्तला प्राप्त उत्तम श्रेणीबद्दल सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)