बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऋतुगंध अंकाचे प्रकाशन

पुणे – बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऋतुगंध या अंकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. महाविद्यालयाच्या महात्मा गांधी सभागृहात साहित्यिक राजन खान व लेखक व पत्रकार राज काझी यांच्या उपस्थितीत बैजिमिक ऋतुरंग या अंकाचे प्रकाशन झाले.

यावेळी व्यासपीठावर प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, उपअधिष्ठाता डॉ. अरूण कोवाळे, डॉ. समीर जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. डी. जी. कुलकर्णी, मॅगझिन सल्लागार डॉ. वर्षा सरोदे उपस्थित होते. सौरभ निवडेकर याने खान व काझी यांची मुलाखत घेतली. या वेळी साहित्यावर चर्चा झाली.

सहा ऋतूंवर आधारित संगीत आणि नृत्य वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सादर केले. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. बैजिमिक ऋतुरंग हे बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अध्यापक आणि विद्यार्थी यांचे विचार व भावना यांचे मुक्‍त व्यासपीठ असल्याचे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)