बी. जे खताळ आजच्या युवापिढीसमोर एक आदर्श

सी. विद्यासगार राव


शतक महोत्सवानिमित्त खताळ यांचा सत्कार

पुणे: स्वातंत्र्यपूर्व काळ पाहिलेले देशाच्या नवनिर्मितीचे साक्षीदार असणारे बी. जे खताळ आजच्या युवापिढीसमोर एक आदर्श आहेत. राज्याच्या सहकार चळवळीतील त्यांचे योगदान अमूल्य आहे. आजही विधानसभेत येऊन राज्याच्या राजकारणाला एक नवीन दिशा देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, अशा शब्दात राज्यपाल सी. विद्यासगार राव यांनी खताळ यांचा गौरव केला. अशा नेत्याला विशेष अध्यादेशाद्वारे विधानसभेत पुन्हा सामाविष्ट करून घेण्याची संधी मिळाली तर तो माझ्या कारकीर्दीतील मोठा सन्मान असेल, असेही त्यांनी सांगितले.

बी. जे. खताळ यांच्या शतक महोत्सवी अभीष्टचिंत सोहळा समिती आणि श्री आदिशक्ती फाउंडेशन यांच्या वतीने राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री बी. जे. खताळ यांचा शतक महोत्सवानिमित्त सोमवारी आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगपती अरुण फिरोदिया, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, समाजवादी नेते कुमार सप्तर्षी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, उद्योजक अरूण फिरोदिया, पन्नालाल सुराणा, वात्रटीकाकार रामदास फुटाणे, डॉ. शरद हर्डीकर, संगमनेरचे आमदार डॉ. सुधीर तांबे, श्री आदिशक्ती फाउंडेशनचे दत्ता पवार उपस्थित होते. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे डी.लिट पदवी बहाल करण्यात आली.

राव म्हणाले, देशाच्या प्रगतीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्यांपैकी खताळ पाटील एक आहेत. त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आजच्या पिढीसमोर आदर्श आहे. लोकांमध्ये कौशल्य विकसनाचे बीज रोवण्यात खताळ यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, खताळ मंत्रीमंडळात होते, तो काळ मी जवळून पाहिला आहे. त्यांची टोपी खूप लोकप्रिय होती. स्वातंत्र्य लढ्यातून आलेल्या विचारातून ती टोपी ठेवलेली होती. कम्युनिस्टांच्या गोटातून आलेली एक अशी टोपी होती जी महात्मा गांधी यांच्या विचारावर चालू होती. तो एक विलक्षण कार्यकाळ होता. सूत्रसंचलन जीवराज चोले यांनी केले, तर आभार सुरेश कोते यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)