बी. जे. एस. विद्यालयात स्वागत समारंभ

वाघोली- वाघोली येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात 11वीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माझी विद्यार्थी विशाल कदम व सुनिल ढगे यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 11 वीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या गुणवत्ता यादीमधील प्रथम विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, प्राचार्य संतोष भंडारी, उपप्राचार्य दिलीप देशमुख, पर्यवेक्षक पांडुरंग पवार, निलीमा ब्रम्हेचा व विजय अंधारे उपस्थित होते. प्रताप मानकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शिक्षण घेणाऱ्या मुलांनी आपले ध्येय निश्‍चित ठेवायला हवे. विद्यालयातील मुला-मुलींनी न घाबरता आपल्या अडचणी पोलीसांना सांगणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विज्ञान शाखेत मलाव पायलने 96.20%, वाणिज्य शाखेत कदम तनुजाने 93%, कला शाखेत तेजस्वी सोनवणेने 74.80% मिळवून प्रथम नंबर प्राप्त केला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)