बी. के. हरिप्रसाद यांना कॉंग्रेसची उमेदवारी

नवी दिल्ली – राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी कॉंग्रेसने बी. के. हरिप्रसाद यांना आपली उमेदवारी जाहीर केली आहे. कॉंग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी एनडीएच्या विरोधात एकच संघटीत उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. या पदासाठी निवडणूक होत आहे. बी. के. हरिप्रसाद हे कॉंग्रेसचे कर्नाटकातील खासदार आहेत ते 64 वर्षीय आहेत.

कॉंग्रेसने प्रथम राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा बहुमान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वंदना चव्हाण यांनी निवडणूक लढवण्याचेही ठरवले होते पण ऐनवेळेला राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अन्य पक्षांनीही आपला उमेदवार उभा न करण्याचे ठरवल्याने अखेर कॉंग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. ही जागा जिंकण्यासाठी 123 मतदारांचा पाठिंबा आवश्‍यक आहे. विरोधी आघाडीकडे एकूण 119 मतदार आहेत तर एनडीएकडे 110 मतदार आहेत. ज्या पक्षांनी अजून आपली भूमिका जाहीर केलेली नाही त्यांची मतेच या निवडणूकीत निर्णायक ठरणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)