बीसीसीआयच्या “फ्री पासेस’ची संख्या अर्ध्यावर

नवी दिल्ली: अनेक राज्य संघटनांकडून “फ्री पासेस’च्या(सन्मानिका) संख्येबद्दल विरोध झाल्यानंतर बीसीसीआयने ही संख्या अर्ध्यावर आणली. प्रशासकांच्या समितीच्या(सीओए) बैठकीत शनिवारी 600 अतिरिक्त फ्री पासेस यजमान संघटनेला देण्याचा निर्णय घेतला आहे.

ही पासेस बीसीसीआयच्या कोट्यातून देण्यात येणार असून यावर वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेपासून अंमल करण्यात येणार आहे. आधिच्या नियमानुसार स्टेडियमच्या एकूण क्षमतेपैकी 90 टक्‍के तिकिटे सामान्य नागरिकांसाठी आणि दहा टक्के तिकिटे सन्मानिका म्हणून यजमान संघटनेसाठी ठेवण्यात यायच्या ज्यातील बीसीसीआयकडे स्वत:चे प्रायोजक आणि प्रशासक यांच्यासाठी पाच टक्के तिकिटे असायची. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेने याच कारणास्तव 24 ऑक्‍टोबर रोजी इंदूरमध्ये वन डे सामना आयोजित करण्यास नकार दिला होता. बंगाल आणि तामिळनाडू संघटनेने देखील अशीच स्थिती राहिल्यास आम्ही यजमानपद भूषविणार नाही, असा इशारा दिला होता.

-Ads-

त्यामुळे या नियमात बदल करत सीओएने बीसीसीआय आपल्या वाट्याच्या 1200 सन्मानिकांची संख्या घटवीत ती 604 वर आणेल, असे सर्व राज्य संघटनांना आश्वासन दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोओएने बीसीसीआयच्या सन्मानिकांची संख्या 1200 वरून 604 वर आणल्याचे आणि यजमान संघटनेला अधिक सन्मानिका उपलब्ध करून दिल्याचे नमूद केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)