बीसीए विद्यालयातील आनंद विभागीयस्तरावर

कुरवली- वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील भारत चिल्ड्रन्स ऍकॅडमी व कनिष्ठ विद्यालयातील आनंद राजेंद्र जठार (रा. कुरवली ता इंदापूर) या विद्यार्थ्यांने मल्लखांब स्पर्धेत यश मिळवले आहे. करमाळा (जि. सोलापूर) येथे होणाऱ्या विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक संचालनालय, जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने बारामती येथील शारदाबाई विद्यानिकेतन विद्यामंदिरात आयोजित जिल्हास्तरीय 17 वर्षांखालील गटात मल्लखांब स्पर्धेत इयत्ता 11 वी मध्ये शिक्षण घेत असलेला आनंद जठारने द्वितीय क्रमांक मिळवल्याने त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यालयाचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर, क्रीडाशिक्षक अमोल गोडसे, गौरीशंकर हत्तीकाळ, ज्ञानेश्‍वर जगताप यांनी जठारला मार्गदर्शन केले. मल्लखांबमध्ये विजयी झाल्याबद्दल वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. पिल्लई, मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी आनंद नगरकर, शाळा समिती अध्यक्ष धीरज केसकर, उपाध्यक्ष पांडुरंग कवडे यांनी अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
96 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
4 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
8 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)