बीड विधानसभा मतदारसंघात १३ हजार ४१९ मतदार बोगस !

शिवसेना जिल्हाप्रमुख खांडेंनी मतदार याद्यांतील बोगस कारभार आणला चव्हाट्यावर
निवडणूक आयोगाला बोगस मतदारांची यादी देत तात्काळ नावे वगळण्याची केली मागणी 
बीड: शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी जोमाने कामाला लागले असून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून, मराठवाडा संपर्कनेते खा चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षसंघटनवाढीसह निवडणूक काळात होणाऱ्या बोगस मतांकडेही त्यांनी आपला मोर्च्या आक्रमकतेने वळवला आहे. कुंडलिक खांडे यांनी बीड विधानसभा क्षेत्रातील हजार-पाचशे नव्हे तर तब्बल १३ हजार ४१९ मतदार बोगस असल्याचे पुराव्यासह निवडणूक विभागाच्या निदर्शनास आणून दिल्याने मतदारसंघात प्रचंड खळबळ उडाली आहे.
निवडणूक विभागाच्या नाकावर टिच्चून एक मतदार दोन ते तीन वेळा मतदानाचा हक्क बजावत असल्याचे नेहमी सांगितले जात होते. जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दोन ते तीन महिने मतदारसंघातल्या याद्या चाळून १३ हजारपेक्षा जास्त बोगस मतदार सापडून ते निवडणूक विभागाच्या निदर्शनास आणून तर दिलेच, हे मतदार तात्काळ कमी केले नाही तर निवडणुकीदरम्यान होणार्‍या परिणामाला प्रशासन जबाबदार असेल, अशी लेखी तक्रार दिल्याने निवडणूक विभाग संबंधित नावे कमी करण्याच्या कामाला लागले आहेत.
बीड शहरासह ग्रामीण भागात हे बोगस मतदार मोठ्या संख्येने आहेत, हे आता उघड झाले आहे. आतापर्यंत बीड जिल्हा प्रशासन अथवा निवडणूक आयोगाकडे अनेकांनी तक्रारी दिल्या मात्र शिवसेना बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंनी निवडणूक विभागाला  थेट याद्यांमधील बोगस नावे पुराव्यानिशीच दाखवून दिले आहेत. बीड मतदारसंघात हजार-दोन हजार नव्हे तर १३ हजार ४१९ मतदार बोगस असल्याचे उघड झाले आहे. या बोगस मतदारांच्या आकड्याने बीड विधानसभा क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. हे बोगस मतदार एका प्रभागात असले की, त्या मतदाराचं नाव दुसर्‍या एका प्रभागात मिळून येतं. भाग नं. १५० मधला ७१ नंबरचा मतदार भाग नं. १०० मध्ये ६१२ क्रमांकावर दिसून येतो. अशा भाग क्रमांक, मतदार क्रमांक आणि मतदाराचे नाव असलेले तब्बल १३ हजार ४१९ मतदार सापडून ते निवडणूक विभागाच्या निदर्शनास जिल्हाप्रमुख खांडे यांनी आणून दिले आहेत. एकूणच बीडमध्ये बोगस मतदारांचा मोठा आकडा समोर आल्याने आजपर्यंतच्या निवडणुकांवर शंका-कुशंका घेतल्या जात आहेत. कुंडलिक खांडे यांनी पुराव्यानिशी बोगस मतदार निवडणूक आयोगाला दिल्याने आयोग लगेच कामाला लागले असून ही नावे आठ दिवसात कमी करू, असे म्हटले आहे. जे काम निवडणूक विभागाचे होते ते काम कुंडलिक खांडे यांनी केले.  त्यामुळे खांडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कंबर कसून कामाला लागल्याचे स्पष्ट होते.
‘ते’ सर्व बोगस मतदार क्षीरसागरांचे – कुंडलिक खांडे 
बीड विधानसभा मतदारसंघात तब्बल १३ हजार ४१९ मतदार बोगस असल्याचे आम्ही पुराव्यानिशी उघड केले आहे. मतदारयाद्या चाळून बोगस मतदार सापडण्यात तब्बल दोन महिन्यांचा वेळ गेलेला असून या याद्यांमध्ये असलेले सर्व बोगस मतदार हे आ. जयदत्त क्षीरसागरांचेच आहेत. २०१४ ची निवडणूक आ जयदत्त क्षीरसागर बोगस मतांवर निवडून आले. आता हा बोगसपणा शिवसेना चालू देणार नाही, खर्‍या मतदारांच्या आधारा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)