बीड जिल्ह्यात 100 पाणी नमुने दूषित

बीड – जून महिन्यात आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत तब्बल 100 पाणी नमुने दूषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऐन पावसाळ्यात पाण्याच्या शुध्दतेचा प्रश्न निर्माण झाला असून दूषित पाण्यामुळे विविध आजार जडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पावसाळ्यात जलजन्य आजार डोके वर काढत असतात. साथरोगांपासून बचावासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पंचायत समित्यांमार्फत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, जून महिन्यात आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील पाणी नमुन्यांची तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात आली. 466 नमुने तपासले, त्यापैकी 100 नमुने सदोष आढळून आले. दूषित पाण्याची एकूण टक्केवारी 21 एवढी आहे. सर्वाधिक दूषित पाण्याचा टक्का वडवणी तालुक्‍यात आहे, तेथे सुमारे 40 टक्के पाणी दूषित असल्याचे भीषण चित्र आढळून आले आहे.

दूषित पाण्याची स्थिती अशी…

तालुका          तपासलेले  नमुने    दूषित नमुने

बीड                113                30

गेवराई             62                  17

माजलगाव         37                  06

आष्टी               20                  04

केज               62                   13

धारुर            20                   04

परळी          41                     08

शिरुर          26                    03

पाटोदा         25                    04

अंबाजोगाई    55                   16

वडवणी       05                   02

 

दूषित पाण्यामुळे या आजारांची भीती

दूषित पाणी आरोग्यासाठी घातक आहे. गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, विषमज्वर, अतिसार असे आजार जडण्याची भीती असते. अद्यापपर्यंत जिल्ह्यात जलजन्य आजारांचे रुग्ण आढळलेले नाहीत, अशी माहिती जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली. सीईओ, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत ग्रामपंचायतींना पत्र पाठवून जलसाठ्यांचे शुद्धीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुका स्तरावर आरोग्य विभागाची शिबिरेही घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

अशी घ्या काळजी..

जलजन्य आजारापासून बचावासाठी शक्‍यतो पाणी उकळून, गाळून, थंड करुन प्यावे. पाणी गढूळ असल्यास तुरटी फिरवावी. लिटर पाण्यात मिली क्‍लोरिन लिक्वीड वापरावे. गरोदर माता, वृद्ध व लहान मुलांची काळजी घ्यावी. आरोग्य अधिकाजयांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)