बीड जिल्ह्यात दमदार पाऊस; बिंदूसरा प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

बीड – मागील दोन दिवसापासून बिंदूसरा धरणाच्या लाभ क्षेत्र भागात झालेल्या पावसाने बिंदूसरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र सोमवारी पहायला मिळाले. रविवारी सायंकाळी आलेल्या पूराने बार्शी नाक्‍याजवळील पूल वाहून गेलेला आहे.

गणरायाच्या आगमना नंतर जिल्ह्यत पाऊस सक्रीय झाला आहे. डोकेवाडा, कर्जणी येथील तलाव तुडुंब भरून वहात आहेत. आता बिंदूसरा प्रकल्प देखील चादरीवरून वाहू लागले आहे. पाणी पहाण्यासाठी बीड शहरातील नागरीक बिंदूसरा येथे गर्दी करू लागले आहेत. रविवारी सायंकाळी बिंदूसरा नदीला पूर आल्याने सोमेश्वर मंदीरा जवळील पर्यायी पूल वाहून गेला आहे. परिणामी पोलिसांनी सोलापूरकडे जाणारी वाहतूक वळवली आहे. आता या परिस्थितीत बीड शहराचा बायपास मार्ग तात्काळ सुरू करणे आवश्‍यक आहे. सोमवारी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी बायपासची पहाणी केली असून हा मार्ग लवकरच वाहतूकीसाठी सुरू करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)