बीड जिल्ह्यात कर्जमाफीसाठी आतापर्यंत फक्त 42 हजार अर्ज

बीड – राज्य सरकारने जाचक अटी लावत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. या योजने अंतर्गत बीड जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपर्यंत अवघ्या 42 हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऍनलाईन अर्ज केले आहेत. दुष्काळ व आवर्षणामुळे जिल्ह्यातून कर्जमाफीची आग्रही मागणी होती; परंतु प्रत्यक्षात कर्जमाफीच्या लाभासाठी अपेक्षित अर्ज आले नाहीत.

राज्य सरकार एकूण राज्यातील कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा 26 लाखांवर गेला असल्याचे सांगत असले तरी बीड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. बीड जिल्हयात कर्जमाफी योजने अंतर्गत 3 लाख 67 हजार ऑनलाईन अर्ज बॅंकांकडे येणे अपेक्षीत आहे. मात्र शनिवारी सायंकाळ पर्यंत कसेबसे 42 हजार एवढेच आले आहेत.

राज्यसरकारने कर्जमाफी करण्यासाठी घातलेल्या अटी अत्यंत जाचक आहेत. या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक हानी भरून निघने तर शक्‍य नाही. अशा स्थितीत शेतकरी शासनाच्या या निर्णयावर समाधानी दिसत नसल्याचेचे सर्वत्र पहायला मिळत आहे. बॅंकेत तासनतास रांगेत उभे राहून कर्जमाफीचा अर्ज भरावा लागत आहे. बॅंक अधिकारी शेतकऱ्यांना अपमानस्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. शासन अन्‌ प्रशासनाच्या या गोंधळात शेतकरी पिचला जात आहे. बीड जिल्ह्यातील कर्जदार शेतकरी संख्येच्या तुलनेत अतिशय नगण्य प्रमाणात कर्जमाफी योजनेचे अर्ज बॅंकाकडे आलेले असल्याचे तुर्तास तरी चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)