बीड जिल्ह्यातील पाच महसूल मंडळांत अतिवृष्टी नोंद

बीड, दि. 28 (प्रतिनिधी) – रविवारी रात्री जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून मांजरसुंबा,नेकनूर, थेरला या तीन ठिकाणच्या अतिवृष्टीमुळे बीडमधील बिंदुसरा नदी काठोकाठ भरून वाहिली. पाली जवळील डोकेवाडा साठवण तलावाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले असून बिंदुसरा धरणही भरले आहे. जिल्ह्यात दोन दिवसापासुन रिमझिम पाऊस सुरु आहे.

रविवारी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. बीड तालुक्‍यातील मांजरसुंबा येथे 78, नेकनूर 72 मीमी पाऊस झाला असुन चौसाळा मंडळात 32,पाली 23, लिंबागणेश 36 मिमी पाऊस झाला आहे. पाटोदा तालुक्‍यातील थेरला 85 तर अंमळनेर 76 मीमी पावसाची नोंद झाली आहे. पाटोदा 22, दासखेड 25 मिमी पाऊस झाला आहे. आष्टी तालुक्‍यातील धामणगाव मंडळातही 76 मिमी पावसाची नोंद झाली असुन एकुण पाच महसुल मंडळात अतिवृष्टी झाल्याचे प्रशासनाने कळविले आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 414.47 मिमी पाऊस झाला. त्याची टक्केवारी 66.12 टक्के एवढी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)