बीड जिल्हा परिषदेच्या सभेत गदारोळ

बीड – जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी विरोधकांच्या गदारोळामुळे चांगलीच गाजली. स्वातंत्र्यदिन तोंडावर आलेला असताना जाचक अटींमुळे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी वंचित राहणार असल्याच्या शक्‍यतेने गटनेते बजरंग सोनवणे यांनी सत्ताधाजयांना कोंडीत पकडले. यावेळी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याचा ठरावही घेण्यात आला.

जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार अध्यक्षस्थानी होत्या. उपाध्यक्षा जयश्री मस्के, सभापती संतोष हंगे, राजेसाहेब देशमुख, युद्धजित पंडित, शोभा दरेकर, सीईओ धनराज नीला यांची उपस्थिती होती. कॉंग्रेसच्या सदस्या आशा दौंड यांनी जिल्ह्यातील शेतीची विदारक स्थिती मांडली. त्यांनी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा ठराव घेण्याची मागणी लावून धरली. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी गटनेते बजरंग सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा मुद्दा उपस्थित केला. रुपयांच्या गणवेशासाठी बॅंक खाते उघडण्याकरता हजार रुपये खर्च करावे लागतात. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनापूर्वी गणवेश मिळणार नाहीत. त्यामुळे शालेय समितीला निधी खर्चाची परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली. शिवाय अंबाजोगाई तालुक्‍यातील शिवाचीवाडी व मैदारी तांडा येथील शाळेचे अंतर कमी दाखवून मुख्याध्यापक व विस्तार अधिकाजयाने दिशाभूल केली. ही शाळा सीईओंनी बंद केली; पण मुख्याध्यापकावर काय कारवाई केली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शाळेबाबत मुख्याध्यापकाने परस्पर न्यायालयात धाव घेतली. जि.प. च्या परवानगीशिवाय न्यायालयात तक्रार कशी काय केली? असा सावलही त्यांनी विचारला. या मुद्द्यावरुन त्यांनी सत्ताधाजयांना कोंडीत पकडले. त्यामुळे बराच गोंधळ उडाला. अशोक लोढा, ऍड. प्रकाश कवठेकर, कल्याण आबूज यांनीही विविध प्रशन उपस्थित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)