बीड – बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, ही घटना मंगळवारी (5 सप्टेंबर) रात्री दहाच्या दरम्यान उघडकीस आली. कालिदास पोकळे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ते पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते आजारी रजेवर होते. रात्री दहाच्या सुमारास त्यांनी शिवाजीगर भागातील राहत्या घरी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. त्यांच्या पश्‍चात वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

महत्त्वाचे म्हणजे पत्नी मुलांसह माहेरी गेल्यानंतर घरात कोणीच नसताना त्यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)