बीडमध्ये पावसाच्या सरी, पिकांना दिलासा

बीड – गेल्या तीन दिवसांपासून पाऊस तर लांबच परंतु वाढत्या उन्हामुळे भर पावसाळ्यात उन्हाळाची अनुभती येऊ लागली होती. शुक्रवारी दुपानंतर वातावरणात बदल होऊन सायंकाळी सातच्या सुमारास मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरवात झाली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून खरीपातील काही पिकांना दिलासा मिळाला आहे.

पावसाने तब्बल दीड महिना ओढ दिल्याने खरीपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सद्य:स्थितीला कापूस आणि सोयाबीन या पिकाबाबत शेतकरी आशादायी असून पावसामध्ये सातत्य गरजेचे आहे. खरीपातील मूग व इतर पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनाबाबत साशंका व्यक्त केली जात आहे. अद्यापपर्यंत सरासरीच्या तुलनेत केवळ टक्के पाऊस झाला आहे. भर पावसाळ्यातच पाणीप्रश्न उद्भवत असून नदी, नाले कोरडेठाक पडले आहेत. अनियमित व अनिश्‍चित पाऊस होत असल्याने पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. किमान उर्वरीत काळात तरी पावसाचे सातत्य रहावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)