बीडमधील शेतकऱ्याचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – जमिनीच्या विक्रीत कमी मोबदला मिळाला म्हणून धुळे येथील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष पिऊन केलेल्या आत्महत्येचे प्रकरण गाजत असतानाच आज बीडमधील एका शेतकऱ्याने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. परंतु, पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

मुंबईत सध्या अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावचे गुलाब शिंगारे (56) हे जमिनीसंदर्भात तक्रार घेऊन मुंबईत दाखल झाले होते. परंतु त्यांना मंत्रालयात प्रवेश करण्यापासुन पोलिसांनी रोखले असता त्यांनी रागाच्या भरात मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतुन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षेवर तैनात असणाऱ्या पोलिसांनी त्यांना त्वरित ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. शिंगरे यांना मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. या आत्महत्येचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)