बीडमधील ऑनर किलींग गुन्हेगाराला शिक्षा होईल

-पंकजा मुंडे
 
पुणे – बीडमध्ये घडलेली ऑनर किलींगची घटना दुर्दैवी आहे. त्यामध्ये पोलीस तपास करत आहेतच; गुन्हेगाराला शिक्षा होईल, असा विश्वास महिला व बालकल्याण तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी व्यक्‍त केला. “एक वादळ चित्रबद्ध करताना’…! स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब…! या आशयाचे शीतलकुमार गोरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या आधी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

या कार्यक्रमाला महापौर मुक्‍ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी उपस्थित होते. बीडमध्ये ऑनर किलींगची घटना गुरुवारी घडली. त्या घटनेने बीड शहर हादरले. याविषयी विचारले असता, “पोलीस तपास सुरू आहे. गुन्हेगारांना शिक्षा होईलच’ असे मुंडे म्हणाल्या.

काकडेंना आकडे विचारा – गिरीश बापटांची शाब्दिक कोटी
खासदार म्हणून आपणच जास्त मताधिक्‍याने निवडून येणार, असे वक्‍तव्य खासदार संजय काकडे यांनी नुकतेच जाहिररित्या केले आहे. त्याविषयी खासदार पदासाठी इच्छुक असलेल्या सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना विचारले असता, “काकडेंना आकडे विचारा’ अशी शाब्दिक कोटी केली. पक्ष ज्याला संधी देईल त्याचा कार्यकर्ता म्हणून मी काम करेन, असेही बापट म्हणाले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)