बीडच्या महिलेचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई – सावकारी जाचाला कंटाळून उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिलेने गेल्या आठवड्यात मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच बीड येथील राधाबाई साळुंखे या महिलेने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या सुरक्षेवर तैनात असलेल्या पोलिसांनी वेळीच या महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला असून ठिकठिकणी आंदोलने सुरू आहेत. त्यातच मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्येचे लोण पसरले आहे. आत्महत्येच्या सत्रामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना सद्या डोळ्यात तेल घालूनच सुरक्षा ठेवावी लागत आहे. असे असताना जमिनीचा निकाल विरोधात गेल्याने मानसिक संतुलन ढासळलेल्या बीडच्या राधाबाई साळुंखे या महिलेने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून देण्याचा प्रयत्न करीत होत्या. परंतु, कार्यतत्पर असलेल्या पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. राधाबाई साळुंखे या बीडच्या रहिवासी आहेत. याप्रकरणी मारिन ड्राईव्ह पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)