बीट पातळीवरील क्रीडा स्पर्धेत हजारो विद्यार्थी सहभागी

मांडवगण फराटा- जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक बीट स्पर्धा आलेगाव पागा येथील श्री. भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्‌घाटन संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब बेनके व सरपंच मनिषा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत आठ केंद्रातील सर्व प्राथमिक शाळा सहभागी झाल्या होत्या.
यामध्ये प्रामुख्याने सांघिक क्रीडा प्रकारात लेझीम, कब्बड्डी, खो-खो, भजन, लंगडी, लांबउडी, थ्रो बॉल, 50 व 100 मिटर धावणे आदी खेळांचा समावेश होता. या स्पर्धेचे आयोजन भैरवनाथ विद्यालय आलेगाव पागा यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमात केंद्रप्रमुख एल. डी. काळे, दत्तात्रय थोरात, रमेश शेलार, दगडु वेताळ, भरत काळे, सुनिल घुंमरे आदी उपस्थित होते. पंच म्हणून संभाजी कुटे, शरद शेलार, नितीन गरुड यांनी काम पाहिले. गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. गोरक्ष डुबे यांनी केले. प्रास्तविक व स्वागत विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम बेनके यांनी केले तर सुहास बिडगर यांनी आभार मानले.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे : सांघिक विजेते – कबड्डी मुले विजेता संघ – शिंदोडी जि. प. शाळा, मुली विजेता संघ – शिंदोडी जि. प. शाळा, खो-खो मुले विजेता संघ -सादलगाव जि. प. शाळा, मुली विजेता संघ – शिरसगाव काटा जि. प. शाळा, लेझीम मोठा गट मुली विजेता – गुनाट जि. प. शाळा, लहान गट मुले विजेता – हनुमंतवाडी निर्वी जि. प. शाळा, लंगडी मुले व मुली -शिंदोडी जि. प. शाळा. लोकनृत्य लहान गट – वडगाव रासाई जि. प. शाळा, मोठा गट-रांजणगाव सांडस जि. प. शाळा.
वैयक्तिक स्पर्धा : 100 मि. धावणे मुले – आशीष सुनिल सूर्यवंशी, मुली – मोहीनी विलास जगताप, 50 मि. धावणे मुले – कुनाल कर्पे, मुली -आकांक्षा काळे, उंचउडी मुले – आशिष सूर्यवंशी, मुली – सत्यजित केसवड, लांबउडी मुले – सुनिल सोनवणे व सत्यजित केसवड, मुली -दिव्या साबळे, उंचउडी मुली -उत्कर्षा आनोसे, चेंडुफेक मुले -करण शितोळे, मुली -समिना शेख, गोळाफेक मुले -शुभम झोंडे, मुली -तनुजा नागवडे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)