बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत जांभोरी शाळेचे घवघवीत यश

तळेघर- जांभोरी येथे पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा महोत्सव अंतर्गत तळेघर बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत जांभोरी शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेचे उद्‌घाटन क्रीडाध्वज फडकवून करण्यात आले. याप्रसंगी उपसभापती नंदकुमार सोनावले, जिल्हा परिषदेच्या सदस्या रुपाली जगदाळे, पंचायत समितीच्या सदस्या इंदूबाई लोहकरे, समाज कल्याण विभागाचे माजी सभापती सुभाष मोरमारे, माजी उपसभापती सलीम तांबोळी, जांभोरी गावचे उपसरपंच विलास केंगले, सुरेश केंगले आदी उपस्थित होते. कब्बड्डी, खो-खो, लोकनृत्य, भजन स्पर्धा, लेझीम, धावणे, लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, चेंडूफेक, वकृत्व आदी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भाग घेतला. गटशिक्षण अधिकारी पोपट महाजन, विस्तार अधिकारी रामदास पालेकर, केंद्रप्रमुख रंजना ऊनवने, चिमा बेंढारी, वसंत गेंगजे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब मडके यांनी केले तर विजय डोके यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)