देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे काँग्रेसने मोदी सरकार निशाण्यावर धरले आहे.  त्यातच देशातील अनेक भागात या बंद ला हिंसक वळण आले आहे.

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शशी थरूर यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करत ‘बंद’ ला पाठिंबा दिला. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, मोदी सरकारचे सर्वात वाईट कृत्य म्हणजे ते प्रत्येक एक लीटर पेट्रोलवर १९.४८ रुपये कर लावते आहे. काँग्रेस सरकारच्या काळात हा कर फक्त ३.९२ च्या आसपास होता. याचठिकाणी बीजेपी सरकार उत्तर द्यावे लागते आहे. ते सामान्य नागरिकांच्या खिशाला त्यांचे लोभी हात लावत आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिल्ली येथील सभेला संबोधित करताना मोदी सरकारवर ताशेरे ओढले. ‘मोदी सरकार हे त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात असमर्थ ठरले आहे. सर्व शेतकरी, छोटे-मोठे उद्योगपती आणि सर्वसाधारण जनता वाढत्या महागाईमुळे खूप त्रस्त आहे.’ असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)