बीजेपीची १५ वर्षांपासूनची मक्तेदारी संपवण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये ‘महायुती’

मध्यप्रदेशमध्ये मागील १५ वर्षांपासून भारतीय जनता पार्टी( बीजेपी) सत्तेत आहे. यामधील जवळजवळ १२ वर्षे शिवराज सिंग चौहान मध्यपरदेशचे मुख्यमंत्री राहिले आहे. आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने भारतीय जनता पार्टीला राज्यात सत्तेतून घालवण्यासाठी उर्वरित सर्व मुख्यपक्ष एकत्र येण्याचा विचार करत आहेत. या महायुतीची प्रक्रिया आणि कार्यकारणी ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत सर्व विरोधी पक्षांनी बीजेपीला सत्तेतून बाहेर कण्याचा संकल्प केला.

मध्यप्रदेशमध्ये तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. त्याच्या धर्तीवर रविवारी राजधानी दिल्ली येथे आठ पक्षांनी मिळून मध्यप्रदेश राज्यातून भारतीय जनता पार्टीला सत्तेतून बाहेर करण्यासाठी संपूर्ण विरोधीपक्ष एकतेसाठी ‘महायुती’ बनवली आहे.

-Ads-

या महायुतीमध्ये काँग्रेसला देखील सामील करण्यात आले आहे. लोकक्रांती अभियानचे संयोजक गोविंद यादव यांनी सांगितले की, संवैधानिक लोकशाही वाचवण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये होत असलेल्या आगामी विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप विरोधी महायुती स्थापन करण्यासाठी रविवारी ही बैठक झाली. या बैठकीत सर्व गैर भाजप पक्षांनी संवैधानिक लोकशाही वाचवण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकतेसाठी सहमती दर्शवली आणि मध्यप्रदेशातून भाजप सरकारला हटवण्याचा संकल्प केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)